विविध लाभाच्या योजना

विद्यार्थ्यांसाठी विविध लाभाच्या योजना

1) सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना :-

    योजनेचे स्वरूप :-

  • अनुसूचित जमातीच्या (S.T.) मुला-मुलींसाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे.
  • इयत्ता 1 ली ते 4 थी साठी वर्षाला रू.1000/-
  • इयत्ता 5 वी ते 7 वी साठी वर्षाला रू.1500/-
  • कमीतकमी 80% उपस्थिती आवश्यक.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रू.108000/- पेक्षा जास्त नसावे.
  • राष्ट्रीयीकृत बँकेत खाते आवश्यक.
  • शाळेमार्फत प्रस्ताव पाठविला जातो.
  • शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्याच्या बँक खात्यात परस्पर जमा होते.
  • डायरेक्ट वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

2) सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना :-

    योजनेचे स्वरूप :-

  • अनुसूचित जातीच्या (S.C.) मुलींसाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे.
  • इयत्ता 5 वी ते 7 वी साठी वर्षाला रू.600/-
  • कमीतकमी 75% उपस्थिती आवश्यक.
  • राष्ट्रीयीकृत बँकेत खाते आवश्यक.
  • शाळेमार्फत ऑनलाईन फॉर्म भरले जातात.
  • शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्याच्या बँक खात्यात परस्पर जमा होते.
  • डायरेक्ट वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

3) अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती योजना :-

    योजनेचे स्वरूप :-

  • सर्व प्रकारच्या अल्पसंख्यांक मुला-मुलींसाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे.
  • इयत्ता 1 वी ते 7 वी साठी वर्षाला रू.1000/-
  • राष्ट्रीयीकृत बँकेत खाते आवश्यक.
  • शाळेमार्फत ऑनलाईन फॉर्म भरले जातात.
  • शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्याच्या बँक खात्यात परस्पर जमा होते.
  • डायरेक्ट वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

4) दारिद्र्यरेषेखालील मागासवर्गीय मुलींसाठी उपस्थिती भत्ता योजना :-

    योजनेचे स्वरूप :-

  • दारिद्र्यरेषेखालील अ.जाती, अ.जमाती व वि.जा.भ.ज.संवर्गाती मुलींसाठी ही योजना आहे.
  • इयत्ता 1 वी ते 4 थी साठी उपस्थित दिवसासाठी रू.1/- प्रमाणे भत्ता. 
  • कमीतकमी 75% उपस्थिती आवश्यक.
  • शाळेमार्फत प्रस्ताव पाठविला जातो.
  • शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्याच्या पालकांना वितरीत केली जाते.
  • शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

5) मागासवर्गीय मुला-मुलींसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना :-

    योजनेचे स्वरूप :-

  • अ.जाती, अ.जमाती व वि.जा.भ.ज.संवर्गाती मुला-मुलींसाठी ही योजना आहे.
  • इयत्ता 5 वी ते 7 वी साठी वर्षाला रू.500/-
  • गत शैक्षणिक वर्षातील इयत्तेत वर्गात प्रथम/द्वीतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांसाठी.
  • शाळेमार्फत प्रस्ताव पाठविला जातो.
  • शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्याच्या पालकांना वितरीत केली जाते.

No comments:

Post a Comment

Thanks ! Please visit again.
कृपया आपली प्रतिक्रिया खाली जरूर नोंदवा.