शैक्षणिक वर्ष २०२३-२४ संपलेले असून दरवर्षी १ मे ही निकालाची तारीख असते. याही वर्षी १ मे रोजी वार्षिक निकाल जाहीर होणार आहे. १ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांची निकालाची उत्सुकता ताणली जाणार आहे.
यावर तोडगा काढण्यासाठी मधला मार्ग म्हणून शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतरिम निकालाप्रमाणे किंवा इतर स्पर्धा परीक्षांच्या ऑनलाईन निकालाप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपणही अंतरिम निकाल जाहीर करावा असा विचार मनात आला. आमचे प्रेरणास्थान मा.निलेशजी पाटील साहेब, गटशिक्षणाधिकारी, पं.स.इगतपुरी यांनी याकामी प्रोत्साहन दिले. तसेच मा.राजेंद्रजी नांदुरकर साहेब, विस्तार अधिकारी (शिक्षण) आणि मा.शमीम पठाण मॅडम, केंद्रप्रमुख, घोटी-२ यांनी पाठबळ दिले. शाळेतील सर्व शिक्षक सहकार्यांनी मदत केली. त्यामुळे अल्पकालावधीतच तयारी करून अगदी 10 वी, 12 वी बोर्डाचे निकाल किंवा कॉलेजच्या निकालांसारखा किंवा विविध स्पर्धा परीक्षांच्या ऑनलाईन निकालाप्रमाणे निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न केला आहे. हा निकाल माझ्या जिल्हा परिषद आदर्श शाळा, माणिकखांब या शाळेच्या इयत्ता १ ली ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या एकूण ३९१ विद्यार्थ्यांसाठी मर्यादित आहे.
- प्रत्येकाच्या निकालाची गोपनीयता अबाधित राहावी यासाठी निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्याला आपला जनरल रजिस्टर नंबर टाकावा लागेल.
- निकाल प्रिंट करण्याची आणि PDF फॉरमॅट मध्ये सेव्ह करण्याचीही सुविधा यात देण्यात आलेली आहे.
धन्यवाद !
Good Job
ReplyDeleteअप्रतिम सरजी
ReplyDeleteGood sir sir mardarshan hoil kya आपणास बनवण्यासाठी
ReplyDeletegreat job sir
ReplyDeleteVery nice
ReplyDelete