विद्यार्थ्यांच्या स्वरचित कविता

माझ्या शाळेत फक्त पहिली ते सातवी पर्यंतच वर्ग आहेत. विद्यार्थ्यांनी कविता शिकाव्यात आणि त्या पाठांतर कराव्यात असाच काहीतरी विचार माझ्यासह जवळपास सर्वच शिक्षकांचा होता. असे म्हटले तरी वावगे होणार नाही. परंतु जेंव्हापासून PSM आला तेंव्हापासून काहीतरी अफलातूनच घडतांना दिसत आहे. माझ्या शाळेतील मुले कविता करायला शिकले. हो, हे अगदी खरे आहे. त्यांना वर्गशिक्षकांनी थोडे मार्गदर्शन केले आणि म्हणता म्हणता विद्यार्थ्यांनी कवितांचा पाऊसच पाडला. 
विद्यार्थी नवखे कवी आहेत. त्यातच ग्रामीण, आदिवासी बोली भाषेचा बाज आहे. कविता वाचताना आपल्यासारख्याला यमक, छंद, मात्रा आणि आपल्याला कवितेच्या बाबतीत माहिती असलेल्या विविध नियमानुसार बघायला गेलो तर थोडे खटकेलही. पण बाळ पहिल्यांदा चालायला शिकतो तेंव्हा जसे त्याच्या तोल जावून पडण्याकडे दुर्लक्ष करून पुढे पडणाऱ्या एक एक पावलाचे कौतुक होते. बस एवढीच अपेक्षा माझी आहे. माझ्या विद्यार्थ्यांच्या कविताही जगभरात पोहचाव्यात ह्या अपेक्षेने त्यांच्याच शब्दांत कविता लेखनास सुरुवात करतो.
श्री.राजेंद्रसिंग रामसिंग मोरकर, मुख्याध्यापक, जि.प.प्राथ.शाळा, उंबरकोन, ता.इगतपुरी, जि.नाशिक.
-----------------------------------------------------------------------------------------------------

कविता लेखन : कु.अक्षदा दत्तू सारुक्ते,  इयत्ता ७ वी 
मार्गदर्शक : श्री.घनश्याम दौलत कोळी, वर्गशिक्षक 

१. नदी


नदीचा रंग असतो निळा निळा 
काठावर असतो खडक काळा  llधृll

नदीच्या पाण्यात असतात साप
त्यांना नाही कशाचेच माप 
नदीच्या काठावर असते शेत 
शेतात असतो उसाचा मळा
नदीचा रंग असतो निळा निळा ll१ll

नदीच्या पाण्यात खेळतात मुले
जणूकाही देवाघरची फुले
नदीच्या काठी येतात पक्षी
त्यांना असतो सुंदर गळा
नदीचा रंग असतो निळा निळा ll२ll


२. फुल - पाखरू


फुलाफुलांवर फुलपाखरू बसते
फुलपाखरू व्हावे असे मलाही वाटते  llधृll

फुले असतात रंगीबेरंगी
जणूकाही इंद्रधनुष्य सप्तरंगी
इंद्रधनुष्याची कमान वाकडी असते
फुलपाखरू व्हावे असे मलाही वाटते  ll१ll


फुलाफुलांवर असते सुंदर फुलपाखरू
जणूकाही गायीचे वासरू
फुलपाखराचे महत्त्व वेगळेच असते
फुलपाखरू व्हावे असे मलाही वाटते  ll२ll

फुलांनी करतात कोणाचाही सत्कार
फुलांना देत नाही कोणी नकार
सगळे जग फुलांना स्वीकारते
फुलपाखरू व्हावे असे मलाही वाटते  ll३ll


३. पाऊस


पाऊस कोठून येतो ? कोठे जातो ?
पाऊस ढगांतून येतो नि जमिनीच्या पोटात शिरतो  llधृll

जेंव्हा गार गार वारा सुटतो
तेंव्हा मुसळधार पाऊस पडतो
पाऊस पडला, की सगळा निसर्ग न्हाऊन निघतो
पाऊस कोठून येतो ? कोठे जातो ?  ll१ll

पाऊस आमच्या लाडाचा 
चार महिने पडतो नेमाचा
पाऊस पडला, की निसर्ग हिरवागार होतो
पाऊस कोठून येतो ? कोठे जातो ?  ll२ll

जून महिन्यात सुटतो गारगार वारा
अन ढगांतून पडतात मोठ्या मोठ्या गारा
पाऊस पडला, की परिसर भरभरून वाहतो 
पाऊस कोठून येतो ? कोठे जातो ?  ll३ll

४. झाडाचे मनोगत


नको नको रे माणसा
नको अविचारी वागू
माझ्या मनातलं दु:ख
तुला कसं सांगू    llधृll

चारापाणी शुद्ध हवा
देतो सावलीही तुला
फळं फुलं तुझ्यासाठी
सर्वकाही देतो तुला  ll१ll

घाव घालून घालून
नको करू माझा नाश
माझ्या नाशात आहे रे
तुझाच सर्वनाश  ll२ll


              .........

2 comments:

  1. वा छान अभिव्यक्ती आहे विद्यार्थ्यांची !

    ReplyDelete

Thanks ! Please visit again.
कृपया आपली प्रतिक्रिया खाली जरूर नोंदवा.