Sunday, 29 November 2020

शाळा सुरु होतांना

       


     कोविड-19, कोरोना हे असे शब्द आहेत की, त्यांनी केवळ काही महिन्यांमध्ये सबंध विश्वाला आपली विनाशकारी शक्तीची झलक दाखवून दिली. बस, टॅक्सी, रेल्वे, विमान, हॉटेल्स, लहानमोठे उद्योग, कारखाने, कार्यालये सर्वकाही बंद बंद आणि बंद. सामान्य माणसाला जीवनावश्यक वस्तूंसाठीही घरातून बाहेर पडणे बंद करून टाकले. मोठमोठे उत्सव, सण, समारंभ, लग्न कार्यात होणारी गर्दी सारे काही बंद. एवढंच काय तर अंत्यविधीलासुद्धा वीस पेक्षा जास्त लोकं जमत नाहीत. या सगळ्या गोष्टींवर सरकारला निर्बंध घालावे लागलेत. हे निर्बंध काटेकोरपणे पाळले गेले नसते तर ........ तर नक्कीच आपल्या देशाची, आपल्या राज्याची परिस्थिती आज आहे त्यापेक्षा निश्चितच खूप वेगळी राहिली असती. हे वेगळे सांगायला नको. शासनाने बंद केलेल्या अनेक गोष्टींमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे. ती गोष्ट म्हणजे शाळा. कोरोनाचा प्रभाव जसजसा कमी व्हायला सुरुवात झाली तसतश्या बंद केलेल्या सर्व गोष्टी हळू हळू पूर्वपदावर येवू लागल्यात. मात्र शाळा अजून पूर्वपदावर आल्या नाहीत. दिवाळीनंतर तरी शाळा सुरु होतील असे वाटत होते. पण दिवाळीच्या धामधूमीत आपण थोडे केयरलेस वागलो की काय (कदाचित याला सध्या वाढलेली थंडीही कारणीभूत असावी) पण दिवाळीपूर्वी अगदीच नगण्य होत चाललेले संसंर्गाचे आकडे दिवाळी संपता संपता पुन्हा फुगायला लागलेले दिसून आलेत. आणि त्यामुळे दिवाळीनंतर शाळा उघडेल या आशेवर असलेले विद्यार्थी, पालक, शिक्षक, शासन, शिक्षणप्रेमी, समाज या सर्वांचाच भ्रमनिरास झाला. शासन आणि प्रशासन यांनी शाळा सुरु करण्याची संपूर्ण पूर्वतयारी केलेली असतांना सुद्धा ऐनवेळी शासनाला शाळा सुरु करण्याचा विचार काही काळासाठी पुढे ढकलावा लागला. 

२०२० संपता संपता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल अशी अशा करूया. भारतासह जगभरात कोरोनाच्या लसीवर सुरु असलेल्या युद्धपातळीवरील प्रयत्नांना यश येण्यासाठी विधात्याकडे मन:पूर्वक प्रार्थना करूया. असे जर झाले तर नक्कीच सध्याच्या विराण झालेल्या शाळांच्या इमारतींमध्ये पुन्हा एकदा बालगोपाळांची किलबिल ऐकायला मिळेल. सध्या आत्माविहीन अवस्थेत असलेल्या विद्यामंदिरात विद्यार्थीरूपी आत्मा येईल आणि ओसाड खंडर वाटणाऱ्या शाळेच्या इमारती सरस्वतीची खरीखुरी मंदिरे बनतील. अशी आशा करूया. तोपर्यंत अजून काही दिवस पालकच आपल्या बालकांचे शिक्षक आहेत. पालकांनी आपल्या मोबाईलवर येणाऱ्या अभ्यासविषयक बाबींसाठी आमच्या विद्यार्थ्यांना सहकार्य करा. डिजिटल  पॅरेंन्टींगची संकल्पना समजून घेऊन मुलांना अभ्यासात मदत करा. हीच अपेक्षा आहे.

विश्वास ठेवा शाळा लवकरच सुरू होतील आणि यावर्षी मागे राहिलेला अभ्यास पूर्ण करून घेण्याचे प्रामाणिक प्रयत्न शाळांमार्फत नक्कीच केले जातील. तोपर्यंत आपण सर्वजण कोविड-19 चे सर्व नियम पाळूया. शासन आणि प्रशासनाकडून वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करून आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण करूया. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हे कुटुंबातील लहानमोठे सगळ्यांनी कायम लक्षात ठेवा. कोरोनाची लस अजून आलेली नाही, त्यावर परफेक्ट औषधही अजून बाजारात उपलब्ध नाही. मग का म्हणून विषाची परीक्षा बघायची. गेल्या आठ महिन्यांमध्ये जगभरात कोरोनाचे एवढे भयानक तांडव सुरु असतानाही त्याला आपण आपल्यापर्यंत पोहचू दिले नाही. आता तर त्याचा अंत व्हायची वेळ आलेली आहे. मग आता थोड्याकरता तरी त्याला कशाला जवळ येण्याची संधी द्यायची. हत्ती निघून गेला आता फक्त शेपूट बाकी आहे. एवढे लक्षात ठेवा आणि त्यासाठी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.

Wednesday, 23 September 2020

माझे कुटुंब माझी जबाबदारी

 *माझे कुटुंब माझी जबाबदारी*

कोविड-19 च्या सावटाखाली संपूर्ण जग आहे. त्याबाबतीत मोठ्या प्रमाणावर जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये आणि त्या विद्यार्थ्यांमार्फत घराघरांत कोविड-19 बाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी नाशिक जिल्हा परिषद, शिक्षण विभागाच्या वतीने ऑनलाईन निबंध स्पर्धा व पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. 

त्यात आपल्या शाळेतही इयत्ता तिसरी ते सातवीच्या वर्गांसाठी ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली. त्यातील विजेते खालीलप्रमाणे आहेत.

त्यांचे निबंध वाचण्यासाठी किंवा पोस्टर पाहण्यासाठी त्यांच्या नावाखाली असलेल्या लिंकला क्लिक करा.

------------------------------------------------

*निबंध स्पर्धा निकाल* 

 *शाळा पातळी* 

(1) *प्रथम क्रमांक* 

➖➖➖➖➖

वैशाली दत्तात्रय चव्हाण

इयत्ता-4 थी ( ब )

निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा


🔹🔹🔹🔹🔹🔹

(2) *द्वितीय क्रमांक* 

➖➖➖➖➖

धनश्री नथू माळी

इयत्ता-5 वी (अ )

निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा

🔹🔹🔹🔹🔹🔹

(3) *तृतीय क्रमांक* 

➖➖➖➖➖➖

निलेश ज्ञानदेव चव्हाण

इयत्ता-6 वी (अ)

निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा

-----------------------------------------------

*पोस्टर स्पर्धा निकाल* 

 *शाळा पातळी* 

(1) *प्रथम क्रमांक* 

➖➖➖➖➖

धीरज  चव्हाण

इयत्ता-4 थी ( ब )

पोस्टर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

🔹🔹🔹🔹🔹🔹

(2) *द्वितीय क्रमांक* 

➖➖➖➖➖

धनश्री नथू माळी

इयत्ता-5 वी (अ )

पोस्टर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

🔹🔹🔹🔹🔹🔹

(3) *तृतीय क्रमांक* 

➖➖➖➖➖

दिक्षा संतोष जाधव

इयत्ता-7 वी (ब)

पोस्टर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 *💐💐💐सर्व  विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन*💐💐💐

मुख्याध्यापक व शिक्षकवृंद

आणि

शाळा व्यवस्थापन समिती

जि.प.प्रा.शाळा- माणिकखांब

ता.इगतपुरी, जि.नाशिक

Friday, 24 July 2020

नाशिक शिक्षण हेल्पलाईन

*शिक्षण विभाग, जि.प.नाशिक व स्वयंसेवी संस्था यांच्या प्रयत्नाने शाळा बंद असतांनाही पालक, विद्यार्थी व शिक्षकांना तंत्रशुद्ध शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी तयार केलेली टेलिग्राम अँप वरील नाशिक शिक्षण हेल्पलाईन जॉईन करण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ.*

https://youtu.be/R4C-3WmMvqc

*हा व्हिडीओ आपल्या विद्यार्थ्यांना/पालकांना पाठवून त्यांनी Telegram app वरील नाशिक शिक्षण हेल्पलाईनला कसे जॉईन व्हावे? यासाठी या व्हिडीओचा आधार घेण्यास सांगावे.*

https://youtu.be/R4C-3WmMvqc

*व्हिडीओ आवडल्यास*
*Like 👍*
*Share ▶️*
*Comment ©️*
आणि *subscribe 🔔* जरूर करावे.🙏🏻😊

धन्यवाद🙏🏻
Raju Morkar (Manikkhamb)

BYJUJ app Information

Save the Children या संस्थेकडून आपल्या शाळेतील स्मार्टफोन वापरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाईल क्रमांकावर BYJUJ app रजिस्टर करून मिळणार आहे.

जि.प.शाळा, माणिकखांबची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Monday, 13 July 2020

ICT Online Education Training Igatpuri

Chatting in Zoom Meeting

दि.१३/७/२०२० रोजी झालेल्या शिक्षकांच्या online training मधील शिक्षकांच्या प्रतिक्रिया वाचण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.