प्राथमिक शिक्षक बदली - २०२२ मधील क्रमांक १ ते ५ टप्पे यापूर्वी अधिकृत पोर्टल वर जाहीर झालेले आहेत. हे सर्व टप्पे संपल्यानंतरही अवघड क्षेत्रामधील काही जागा रिक्त राहिल्या असतील तर त्या जागा १००% भरण्यासाठी सुगम क्षेत्रात १० वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या शिक्षकांमधून त्या जागा भरण्यासाठी पोर्टलवर रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात आलेला आहे.
या टप्प्यातील पात्र ठरलेल्या शिक्षकांच्या प्रकारानुसार योग्यप्रकारे वर्गवारी करून आपल्या माहितीसाठी कोणकोणत्या शाळांवर जागा रिक्त आहे हे एकाच दृष्टीक्षेपात येण्यासाठी तालुकानिहाय रिक्त जागांचा तपशील देण्यात आलेला आहे.
शक्यतो या टप्प्यात पोर्टल मार्फतच पदस्थापना होण्याची शक्यता जास्त आहे. परंतु, फॉर्म भरण्याची वेळ आलीच तर ह्या याद्या आपणांस उपयुक्त ठरू शकतात.
यादी पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.👇
👉 प्राथमिक शिक्षक रिक्त यादी UGT
👉 मुख्याध्यापक रिक्त पदांची यादी HM
👉 गणित-विज्ञान पदवीधर रिक्त पदांची यादी Gr.Tr.MAths/Sci
👉 भाषा पदवीधर रिक्त पदांची यादी Gr.Tr.Lang.
👉 सामा.शास्त्र पदवीधर रिक्त पदांची यादी Gr.Tr.Soc/Sci
👉 सर्व रिक्त पदांची एकत्रित यादी
धन्यवाद !
No comments:
Post a Comment
Thanks ! Please visit again.
कृपया आपली प्रतिक्रिया खाली जरूर नोंदवा.