इन्स्पायर अवार्ड

Inspire Award

Inspire Award साठी online registration केलेल्या विद्यार्थ्यांच्या Sanction Orders आणि Certificate बाबत...

इयत्ता 6 वी ते 10 वी इयत्तेत शिकत असलेल्या प्रत्येक इयत्तेतील एका विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे इन्स्पायर अवार्ड अंतर्गत विज्ञान क्षेत्रातील संशोधनासाठी रू.5000/- वितरीत केले जातात. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान साहित्य बनवावे हा उद्देश त्यामागे आहे. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या साहित्याचे जिल्हास्तरावर दरवर्षी प्रदर्शन भरविण्यात येते. मागील वर्षापर्यंत विद्यार्थ्यांचा प्रस्ताव मॅन्युअली देण्यात येत होता. चालू शैक्षणिक वर्षापासून मात्र शाळेचे आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सर्व पात्र शाळांनी यापूर्वीच केलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन केलेले आहे त्यांचे रू.5000/- मंजूर झाल्याबद्दलचे प्रमाणपत्र व आदेश डाऊनलोड करण्यासाठी इन्स्पायर अवार्डच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

Sample

खाली दिलेल्या लिंकचा वापर करून आपल्याला आपल्या शाळेचा User ID व Password वापरून प्रमाणपत्र व मंजूरी आदेश PDF फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करून त्याची प्रिन्ट घेता येईल. त्यासाठी खालील सूचनांप्रमाणे जावे :
1.  आपल्या शाळेचा User ID व Password वापरून Login करावे.

2. View Awards Sanctioned by NA या आयकॉनवर क्लिक करावे.

3. सन 2014-15 ची Sanction Order व List of Awardees दिसेल. त्यावर क्लिक करावे.

4.  त्यानंतर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची यादी दिसेल. यादीतील Sr.No.च्या अगोदर असणाऱ्या बटनवर क्लिक केल्यास PDF File डाऊनलोड होईल. त्यानंतर आपल्याला त्याची प्रिन्ट घेता येईल.
इन्स्पायर अवार्डसाठी रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांच्या Sanction Order आणि Certificate साठी येथे क्लिक करावे.

No comments:

Post a Comment

Thanks ! Please visit again.
कृपया आपली प्रतिक्रिया खाली जरूर नोंदवा.