School Database

School Database बाबत सचित्र माहिती

चालू शैक्षणिक वर्षापासून शासनाने प्रत्येक शाळेसाठी Online School Database भरणे अनिवार्य केले आहे. भविष्यात त्याचे अनेक फायदे शिक्षण क्षेत्राला होणार आहेत. सुरूवातीला School Database नंतर Staff Database आणि शेवटी Students Database भरून पूर्ण करायचा आहे. एकदा माहिती भरून झाल्यावर वर्षभर द्यावयाच्या अनेक माहितींपासून मुख्याध्यापक / शिक्षकांची सुटका होणार आहे.
माहिती भरण्यासाठी आपल्याला https://education.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन SCHOOL या बटनवर क्लिक करून Login करावे लागेल. Login साठी आपल्या शाळेने संच मान्यतेसाठी वापरलेला USER ID आणि PASSWORD वापरायचा आहे. त्यानंतर खालील चित्रांमध्ये दाखविल्याप्रमाणे एकूण 84 पानांमध्ये आपल्या शाळेची माहिती भरायची आहे. आपल्याला माहिती भरणे सुकर जावे यासाठी हा एक प्रमाणिक प्रयत्न.

दिनांक 7 व 8 जुलै 2015 या कालावधीत नाशिक जिल्ह्यासाठी School Database, Staff Database आणि Students Database याबाबत प्रशिक्षण होत आहे.  जिल्हास्तरावर प्रशिक्षण घेऊन यासंबंधातील सविस्तर माहिती सूचनांसह येथे दिली जाईल. 


प्रत्येक तालुक्यात दि.9 जुलै 2015 व 10 जुलै 2015 या दोन दिवसांत तालुकास्तरीय School, Staff & Student Database प्रशिक्षण होत आहे. सर्व मुख्याध्यापकांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अत्यंत महत्त्वाचे व ऐतिहासिक कामाची सुरूवात आपल्या हातून होणार आहे. याची जाणीव ठेवून हे प्रशिक्षण अगदी मनापासून घ्यावे. ही नम्र विनंती. कारण येत्या महिनाभरात म्हणजे 14 ऑगस्ट 2015 पर्यंत आपल्याला हे काम पूर्ण करावयाचे आहे. 
अडचण आल्यास खाली संपर्कासाठी ईमेल व दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

E-mail:support.education@maharashtra.gov.in
Help Line No.(Toll Free) 18002331899
Help Line support. 18002330700
Help Line support. 18002330800
Help Line support. 18002331899
Timing: 08:00 AM - 08:00 PM (Only Working Day's)
Contact Details of Education Departments.
























































































No comments:

Post a Comment

Thanks ! Please visit again.
कृपया आपली प्रतिक्रिया खाली जरूर नोंदवा.